महायुतीचे किरण सरनाईक निर्णायक आघाडीवर

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
विजयासाठी १६,१३४ मतांचा कोटा
 
अमरावती 
shikshak matadarsangha nivadanuk विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांनी ८ हजार १६२ मते मिळवत निर्णायक आघाडी घेतली आहे. शिवसेना बंडखोर डॉ. श्रीकांत देशपांडे आणि अदिती ऋषिकेश पोहरे यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. देशपांडे यांना ४ हजार ६६८, तर पोहरे यांना ४ हजार ६८८ मते मिळाली आहेत.
 
 
sarnaik
निवडणुकीच्या एकूण मतमोजणीत ३३ हजार ३४ मतांची मोजणी करण्यात आली. त्यापैकी ३२ हजार २६६ मते वैध, तर ७६८ मते अवैध ठरली. निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी घोषित करण्यासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. मतांच्या आकडेवारीनुसार शिक्षक भारतीचे सुरेश देवकर यांना ३ हजार २३६, विमाशीचे दिलीप कडू यांना २ हजार ६७४, शिवसेना उबाठाचे दत्तात्रय लहाने यांना २ हजार १५५ आणि मराशिपच्या डॉ. संगीता सचिंद्र शिंदे (बोंडे) यांना १ हजार ९६४ मते मिळाली आहेत.
 
 
shikshak matadarsangha nivadanuk चंद्रशेखर भोयर यांना १ हजार ३७५, डॉ. प्रशांत विघ्ने यांना १ हजार २६७, डॉ. अविनाश बोर्डे यांना १ हजार २६ मते मिळाली. गजानन उल्हे (पाटील) यांना ४६७, किरण चौधरी यांना १७७, तर डॉ. सुमित पवार यांना १५२ मते मिळाली. इतर उमेदवारांमध्ये संतोष हुशे यांना ७४, आशिष अंबुलकर यांना ३४, राजेशकुमार कड यांना ३२, विनोद कडू यांना ३०, गजानन ढोके यांना २१, उपेंद्र पाटील यांना १२, प्रा. अनिल काळे आणि किरण पवार यांना प्रत्येकी ११ मते मिळाली. हेमलता दिलीपसिंग मुनोत यांना ७, तर अशोक हिवाळे, प्रा. मिलिंद ब्राह्मणे आणि श्रीकृष्ण पहुरकर यांना प्रत्येकी ६ मते मिळाली. रामदास कातक यांना ५ मते मिळाली. एकूण मतमोजणीत सरनाईक यांनी आघाडी घेतली असली, तरी विजयासाठी आवश्यक असलेला १६ हजार १३४ मतांचा कोटा अद्याप कोणत्याही उमेदवाराने गाठलेला नसल्याने मतांच्या हस्तांतरणानंतरच अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी हाती घेण्यात आली होती.