इंझोरी परिसरातील शेतकर्‍यांचा वीज आणि पाण्यासाठी एल्गार

२९ ऑटोबरला कुटुंबासह रास्ता रोकोचा इशारा

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
मानोरा,
washim-news खरीप हंगामातील हळद आणि तूर पिक जगविण्यासाठी अडाण धरणातून पाणी आणि तोडलेले वीज कनेशन तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी इंझोरी, जामदारा व तोरणाळा ता. मानोरा येथील शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम येथे २७ ऑटोबर रोजी निवेदन देण्यात आले.
 
 
washim-news
 
शेतकर्‍यांनी निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खरीप हंगामात हळद व तूर पिकाची लागवड केली. आज हळद या एका पिकाला एकरी २ लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. आज आमच्या तोंडाशी आलेला घास शासन हिरावून घेत आहे. धरणात ५१% पाणी साठा आहे तरी सुद्धा आमची वीज कनेशन कापले आहे. त्या धरणामुळे आमच्या शेती गेल्या, जामदरा व तोरणाळा गावाचे पुनर्वसन झाले आहे, तरी आमच्यावर अन्याय होत आहे.शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, यावर्षी कापूस आणि सोयाबीन हे पीक पूर्णतः हातचे गेले आहे. कसतरी हळद पिकावर त्यांची आशा टिकून होती. मात्र, वीज जोडणी तोडल्याने आणि अडाण प्रकल्पातून पाणी न मिळाल्याने हळद आणि तूर दोन्ही पिके धोयात आली आहेत.
 
 
कर्जबाजारी झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी व्यथा शेतकर्‍यांनी मांडली आहे.अडाण प्रकल्पात सध्या ५१% पाणी साठा उपलब्ध आहे.या साठ्यातून केवळ ०.०८ टक्के पाणी आठवड्यातून २ दिवस आळीपाळीने दिले तरी हळद-तूर पीक वाचू शकते, असा अंदाज शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.शेतीसाठी तोडलेले वीज कनेशन तात्काळ पूर्ववत सुरू करावे या रास्त मागणीचा विचार न केल्यास आणि हळद पिकाला पाणी न मिळाल्यास २९ ऑटोबर रोजी ११.३० वाजता कारंजा ते मानोरा रोडवर, इंझोरी जवळ धामणी फाटा या ठिकाणी कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
 
 
शासनाची मदत नको, पण आमचे हक्काचे पाणी द्या, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, कारंजा, तहसीलदार, मानोरा आणि ठाणेदार, पोलीस स्टेशन मानोरा यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर शेतकरी - जगदीश नरहरी आरेकर, आकाश अनिल हळदे, पंकज मनोहर कारेकर आदींच्या सह्या आहेत.