नागपूर,
entrepreneur suyash singh गॅलेक्सीआयचे संस्थापक आणि भारतातील पहिल्या खासगी उपग्रहाला अवकाशात प्रक्षेपित करणारे दूरद्रष्टे युवा उद्योजक सुयश सिंहने प्रा. राजेंद्र सिंह सायन्स एक्स्प्लोरेटरी (पीआरएसएसई) च्या उद्योन्मुख संशोधकांशी संवाद साधत नागपूरमधूनही भविष्यात प्रतिभावान अंतराळ संशोधक आणि उद्योजक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रा. राजेंद्र सिंह सायन्स एक्स्प्लोरेटरी (पीआरएसएसई) ला मूळ नागपूरचे असलेले सुयश सिंह यांनी रविवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या संवादात्मक कार्यक्रमाला २०० विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सुयश सिंह यांनी हायपरलूप विकसित करण्यापासून ते १३० उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडला. यश मिळवायचे असेल तर विषयाचा पाया मजबूत करणे, सातत्य राखणे आणि स्वतःची खरी आवड व क्षमता यांच्याशी सुसंगत करिअर निवडणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.entrepreneur suyash singh आयुष्य कधीही सोपे नसते; मात्र नवीन आव्हानांना सामोरे जाताना ते अधिक आनंददायी बनते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सतत शिकत राहण्याचा आणि चिकाटीने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
शाळांमधील विद्यार्थ्यांना वार्षिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या पीआरएसएसईच्या उपक्रमाचे सिंह यांनी कौतुक केले. यावेळी पीआरएसएसईच्या संचालिका डॉ. सीमा उबाळे, अध्यक्ष श्री. हेमंत चाफले आणि सल्लागार विनय सालोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.