सावधान! डेंग्यू पसरतोय; २८ दिवसांत आढळले सहा रुग्ण

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
वर्धा,
dengue जिल्ह्यात एकीकडे अल्प पर्जन्यमानामुळे जलसंकटाची स्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २८ दिवसांत जिल्ह्यात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अ‍ॅशन मोडवर आली आहे. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन हिवताप विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
dengue
 
२८ दिवसांत जिल्ह्यात आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सेलू, आर्वी आणि हिंगणघाट तालुयांतील प्रत्येकी एका रुग्णाचा, तर वर्धा तालुयातील ३ रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूचा प्रसार प्रामुख्याने एडिस डासाच्या चाव्यामुळे होतो. घरात तसेच परिसरात साचलेल्या स्वच्छ पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे घराभोवती, गच्चीवर, अंगणात किंवा इतर ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. तसेच पाण्याच्या टाया झाकून ठेवणे, वापरात नसलेल्या भांड्यातील पाणी रिकामे करणे, कुलरमधील पाणी नियमित बदलणे आणि परिसराची स्वच्छता राखणे यांसारख्या खबरदारीच्या उपाययोजनाही नागरिकांनी कराव्या, असे आवाहन आरोग्य अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.
 
 
डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस नागरिकांनी पाळावा. या दिवशी घर व परिसरातील पाणी साठवून ठेवणारी भांडी रिकामी करून स्वच्छ करावीत, ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा इतर त्रास जाणवल्यास नागरिकांनी स्वतःहून औषधे घेण्याऐवजी तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉटरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नलिनी विखे यांनी केले आहे.