कारंजात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची धडक कारवाई

आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त, पुढील तपास सुरु

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड,
illegal-money-lending-in-karanja वाशीम जिल्ह्यातील तालुयातील कथित अवैध सावकारी व्यवहारांच्या तक्रारींची दखल घेत सहकार विभाग आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने बुधवारी, २८ ऑटोबर रोजी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम १६ अंतर्गत नितीन पुरुषोत्तम धोटे यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान उसनवार चिठ्ठ्या, कोरे धनादेश, खरेदीखत आणि इतर एकूण सात आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
 
 
illegal-money-lending-in-karanja
 
सहकार विभागाकडे कारंजा तालुयातील अवैध सावकारी व्यवहारासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार झडतीची कार्यवाही करण्यात आली. झडतीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून, त्यातून समोर येणार्‍या बाबींनुसार सावकारी कायद्यांतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन आणि जिल्हा उपनिबंधक माणिक लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक निबंधक सुनील भालेराव, सहकार अधिकारी श्रेणी-१ शीतल पोंदे, सहाय्यक सहकार अधिकारी संजय सांगळे आणि पंकज काळे यांच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला. तसेच महसूल व पोलिस विभागातील पोलिस उपनिरीक्षक इमरान पठाण आणि इतर कर्मचार्‍यांनीही कार्यवाहीत सहभाग नोंदविला. दरम्यान, झडतीत जप्त करण्यात आलेल्या सात कागदपत्रांची तपासणी आणि चौकशीनंतरच या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.
 
अवैध सावकारीविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन
कारंजा तालुयात कोणत्याही व्यक्तीकडून बेकायदेशीर सावकारी केली जात असल्यास किंवा जाचक व्याजदर आकारून आर्थिक पिळवणूक होत असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक निबंधक सुनील भालेराव यांनी केले आहे. अशा तक्रारी सावकारांचे जिल्हा निबंधक, वाशीम किंवा सावकारांचे सहाय्यक निबंधक, कारंजा यांच्याकडे दाखल करता येतील.