इराण,
Direct hit-houthis-riyadh-ballisticअमेरिकेचे युद्ध संपलेले नसताना आता इराण समर्थित येमेनच्या हुती बंडखोरांनी मंगळवारी ( २७ ऑक्टोबर २०२६ ) सौदी अरबची राजधानी रियाद येथील संरक्षण मंत्रालयावर बॅलेस्टिक मिसाईल हल्ला केल्याचा दावा केला आहे. ही बॅलेस्टिक मिसाईल थेट निशाण्यावर लागल्याचे हुतींनी म्हटले आहे.
हुतींचे मिलिट्री प्रवक्ते याह्या सरी यांनी म्हटले की आमच्या सशस्र दलाने शत्रूची राजधानी रियाद येथील संरक्षण मंत्रालयाला बॅलेस्टिक मिसाईलने लक्ष्य केले आहे आणि हल्ला थेट निशाण्यावर लागला आहे. सौदी अरबने मंगळवारी हुतींनी डागलेल्या मिसाईल आपण रोखल्याचा दावा केल्यानंतर हुतींनी हा दावा केला आहे.
हुतींनी हा देखील दावा केला आहे की त्यांनी सौदी अरबची सर्वात मोठी तेल रिफायनरी रास तनुराला देखील लक्ष्य केले आहे. ही रिफायनरी स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या पश्चिम दिशेला खाडीच्या किनारी स्थित आहे. हुती मिलिट्रीचे प्रवक्ते याह्या सरी यांनी म्हटले आहे की त्यांनी रिफायनरीवर एक बॅलेस्टिक मिसाईल डागली. ज्यामुळे तेथे आग लागली. मात्र, सौदी अरबच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलेला नाही.
सौदी अरब आणि इराणच्या समर्थन असलेल्या हुती बंडखोरात सप्टेंबर महिन्यापासून संघर्ष वेगवान झाला आहे. हा तणाव अमेरिका आणि इराणच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या अनेक महिन्यानंतर वाढला आहे.