हे काय भलतेच....जेवण करून डेक्सवर आले अन् लॅपटॉप लॉक, आयडी बंद;

पर्सनल मेलवर पाठवला हकालपट्टी लेटर, 550 भारतीय कर्मचाऱ्यांसोबत घडला भयंकर प्रकार

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
indian employees 28 वर्षीय इंजिनिअरसाठी सोमवारचा दिवस अगदी नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. मात्र कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता अचानक नोकरी गमवावी लागेल, याची त्याला कल्पनाही नव्हती. Innodata India Pvt Ltd या कंपनीतील कर्मचारी कपातीचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याचाही समावेश होता. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील जवळपास 550 कर्मचाऱ्यांना अचानक करण्यात आलेल्या या कर्मचारी कपातीचा फटका बसला आहे.
 
exit notice
कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरू झाला होता. कर्मचाऱ्यांनी आपल्या सिस्टीममध्ये लॉग इन केले आणि दिवसाचे काम सुरू करण्यापूर्वी हजेरी नोंदवली. मात्र दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत कर्मचाऱ्यांचा कंपनीच्या लॅपटॉपमधील सिस्टीमचे लॉग इन हळूहळू बंद होऊ लागले. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक ई-मेलवर त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे ई-मेल पाठवण्यात आले.
एका कर्मचाऱ्याने सांगितले, एकामागून एक आमच्या सिस्टीममधील लॉग इन बंद होऊ लागले. लॅपटॉपमधून लॉग आउट करण्यात आले आणि आमचे ऑफिस आयडी बंद करण्यात आले.
एका कर्मचाऱ्याने सांगितले की, सोमवारची सकाळ नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. मात्र कर्मचाऱ्यांचा सिस्टीमवरील प्रवेश बंद होऊ लागल्यानंतर सर्वांना धक्का बसला. सोमवारची सकाळ नेहमीप्रमाणेच सुरू झाली होती. आम्ही सर्वांनी लॉग इन केले आणि दैनंदिन कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपली हजेरी नोंदवली. त्यानंतरही नेहमीप्रमाणेच काम सुरू होते. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत कामाचा नेहमीचा गोंधळ आणि धावपळ सुरू होती.
काही वेळातच कंपनीच्या फिलिपिन्समधील टीममधील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती पसरू लागली. यामध्ये रेटर्स, क्वालिटी एक्सपर्ट्स, टीम लीडर्स आणि ऑपरेशनल मॅनेजर्स यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांना झूम कॉलदरम्यान कामावरून कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
ही माहिती पसरल्यानंतर भारतातील कर्मचाऱ्यांनी कंपनीचे एचआर पोर्टल तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोर्टलवर त्यांच्या पगाराच्या स्लिप तयार झाल्याचे दिसत होते. तसेच 26 ऑक्टोबर ही अधिकृत राजीनाम्याची तारीख आणि कामाचा शेवटचा दिवस म्हणून नमूद करण्यात आली होती.