मुंबई
jio reliance जिओ प्लॅटफॉर्मचे शेअर बाजारातील पदार्पण अतिशय ऐतिहासिक ठरले. या पदार्पणामुळे देशातील सर्वाधिक मौल्यवान उद्योग समूहांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. बुधवारी जिओचा समभाग 1358 रुपयांवर सूचिबद्ध होताच रिलायन्स समूहाने टाटा समूहाला मागे टाकत देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे स्थान पटकावले.
जिओच्या सूचिबद्धतेनंतर रिलायन्स समूहातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 28.0 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. टाटा समूह 25.6 लाख कोटी रुपयांसह दुसèया तर अदानी समूह 16.6 लाख कोटी रुपयांसह तिसèया स्थानावर राहिला.
जिओच्या या दमदार पदार्पणामुळे रिलायन्स समूहाच्या बाजारमूल्यात मोठी भर पडली. प्रति समभाग 1110 रुपये इश्यू प्राइज असलेल्या जिओचा समभाग 1358 रुपयांवर सूचिबद्ध झाला. म्हणजेच इश्यू प्राइजच्या तुलनेत त्याने 21.4 टक्के प्रीमियम नोंदवला. या किमतीनुसार जिओचे बाजार भांडवल 12.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्स यांचे एकत्रित बाजारमूल्य 28.7 लाख कोटी रुपये झाले. जिओ प्लॅटफॉर्मच्या भागधारकांची संख्याही देशात सर्वाधिक आहे. कंपनीचे एकूण 79.8 लाख भागधारक आहेत.