नागपूर
nagpur election राज्यातील विधान परिषद निवडणुकीत नागपूर पदवीधरची निवडणूक सर्वाधिक उत्कंठावर्धक राहिली आहे. सलग 24 तास चाललेल्या मतमोजणीतून दर तासाला धक्कादायक कल हाती आले. सर्वात मोठा धक्का कराळे मास्तरांच्या मतांच्या आकड्यांनी दिला आहे.

पहिल्या फेरीत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुसèया फेरीत चित्र पालटले आणि ही फेरी संपेपर्यंत भाजपचे सुधाकर कोहळे 4,291 मतांनी आघाडीवर आले. मात्र, सुधाकर कोहळे यांच्यासह कुठल्याच उमेदवाराचा विजयाचा कोटा पूर्ण झाला नसल्याने आता दुसèया पसंतीच्या मतांची मोजणी सुरु झाली आहे. पहिल्या दोन फेèयांच्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी कमाल केल्याचे दिसून आले. नितेश कराळे पहिल्या दोन फेèयांमध्ये 24,249 मतं मिळवून तिसèया क्रमांकावर आहेत. आता त्यांच्या मतांपैकी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना दुसèया पसंतीची किती मतं मिळतात हाच मुद्दा नागपूरच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मतदानाच्या काही तास आधी शरद पवार गटाने नितेश कराळे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. पक्षाच्या या निर्णयामुळे नितेश कराळे प्रचंड दुखावले गेले होते. त्यांनी मतदानाच्या काही तास आधी सोशल मीडियावर ओक्साबोक्सी रडतानाचा व्हिडीओ टाकला होता. कराळे मास्तरांच्या या इमोशनल गेमचा मतदानच्या दिवशी त्यांना फायदा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूरमध्ये 60 टक्के मतदान झाले होते. तर चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली भागात या निवडणुकीसाठी 71 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. या निवडणुकीत संपूर्ण भाजपा पक्ष एकदिलाने मैदानात उतरला होता. याचा प्रभाव निश्चितच मतदारांवर झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे काल सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा भाजपच्या सुधाकर कोहळे यांना आपल्या विजयाचा पूर्ण विश्वास होता. आपण पहिल्याच फेरीत विजयी होऊ, असे त्यांना वाटत होते. मात्र, रात्रीपर्यंत हे चित्र बदलत गेले आणि दुसèया पसंतीच्या मतांची मोजणी करण्याची वेळ येऊन ठेपली.
जेन झीकडे काँग्रेस, भाजपाचे दुर्लक्ष झाले का?
कराळे मास्तर समाज माध्यमांवर बèयापैकी सक्रिय असतात. युवावर्गात ते लोकप्रिय देखील आहेत. त्यातही नवी पिढी अर्थात नवमतदार असणारे जेन झी समाज माध्यमांवर जास्त आहेत. त्यांचा कल लक्षात न घेता काँग्रेस, भाजपाने प्रचाराची रणनीती आखली का, असा प्रश्न आता विचारला जातो आहे.