कर्नाटकात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का

जागांवर पराभव; भाजप-जेडीएसची बाजी

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
बंगळुरू
Karnataka MLC Election विधान परिषद निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. चार जागांवरील निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. विरोधी पक्ष जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडीएसने काँग्रेसकडील एक जागा जिंकली, तर मित्रपक्ष भाजपने आपल्या तीनही जागा कायम राखल्या. या निकालामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
 
 
beng
बंगळुरू शिक्षक मतदारसंघात भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या जेडीएसचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य पुट्टण्णा यांचा ९०८ मतांनी पराभव केला. रंगनाथ यांना १० हजार ८१० मते मिळाली, तर पुट्टण्णा यांना ९ हजार ९०२ मतांवर समाधान मानावे लागले.
 
ईशान्य शिक्षक मतदारसंघात भाजपचे विद्यमान विधान परिषद सदस्य शशील जी. नमोशी यांनी काँग्रेसचे उमेदवार शरणप्पा मत्तूर यांना पराभूत केले. नमोशी यांना १५ हजार ५९६ मते मिळाली, तर मत्तूर यांना १२ हजार २९९ मते मिळाली. नमोशी यांनी ३ हजार २९७ मते मिळाली.