दुसऱ्या पसंतीतही किरण सरनाईक आघाडीवर

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
अमरावती
kiran sarnaik दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांची आघाडी कायम असून त्यांना 18 व्या फेरीनंतर 8796 मते मिळाली आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना 5355 मते मिळाली. शिवसेना बंडखोर डॉ. श्रीकांत देशपांडे यांना 5035 मते मिळाली आहे. आतापर्यंत 18 उमेदवार बाद झाले आहेत. आणखी 6 उमेदवार बाद होतील. तत्पूर्वी त्यांच्या मतपत्रिकेवर ज्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते मिळाली असेल ती त्यांच्याकडे वर्ग होतील. शेवटी दोन उमेदवार राहतील. ज्याला सर्वाधिक मते असतील त्याला विजयी घोषित केले जाईल. विजयाचा कोटा पूर्ण केला असो की नसो. दुपारी 4 पर्यंत विजयी उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
 

kiran sarnaik leads in second preference votes in amravati graduate constituency election