महायुतीचे किरण सरनाईक विजयी

सलग दुसऱ्यांदा आमादार

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
अमरावती शिक्षक निवडणूक
 
 
अमरावती,
kiran-sarnaik विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मंगळवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी पाच वाजता पूर्ण झाली. महायुतीचे शिवसेना उमेदवार किरण सरनाईक यांना १६,६६३ मते पडली त्यांनी १६,१३४ मतांचा विजयासाठीचा निश्चित कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. सलग दुसऱ्यांदा ते शिक्षक आमदार झाले आहे.
 
 
kiran-sarnaik
 
२४ व्या फेरीमध्ये शिवसेनेचे बंडखोर डॉ. श्रीकांत देशपांडे हे बाद झाले आहेत. त्यांना ७ हजार १७ मते मिळाली. या फेरीत किरण सरनाईक यांनी १६ हजार ६६३ मते मिळवून आघाडी घेतली, तर काॅंगेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे यांना ८ हजार ६३६ मते मिळाली.
 
 
मतमोजणीत जे उमेदवार बाद झाले. त्यामध्ये शिवसेना उबाठाचे दत्तात्रय लहाने, प्रा. अनिल काळे, गजानन ढोके, शिक्षक भारतीचे सुरेश देवकर, डॉ. अविनाश बोर्डे, अशोक हिवाळे, आशिष आंबुलकर, उपेंद्र पाटील, दिलीप कडू , विनोद कडू , गजानन उल्हे (पाटील), किरण चौधरी, किरण पवार, डॉ. प्रशांत विघे, प्रा. मिलिंद ब्राम्हणे, चंद्रशेखर भोयर, कड राजेशकुमार, रामदास कटक , श्रीकृष्ण पहूरकर, डॉ. सुमित पवार, डॉ. संगीता सचिंद्र शिंदे (बोंडे), संतोष हुशे आणि हेमलता दिलीपसिंग मुनोत यांचा समावेश आहे. फेरी क्रमांक २४ मध्ये संपुष्टात आलेली मते ६ हजार ९६७ इतकी नोंदविण्यात आली आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे उमेदवारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर किरण सरनाईक यांनी बाजी मारली. महयुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.