दिवाळी निमित्त सिलेंडरच्या किमतींचं नवं गणित!

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
नागपूर,
LPG gas price on diwaliअवघ्या काही दिवसांवर दिवाळी आल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लगबग वाढलेली आहे. फराळ, मिठाईपासून ते जेवणासाठी गॅस सिलेंडरची मागणी वाढली असताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. 28 ऑक्टोबर अर्थात आज जाहीर झालेल्या दरानुसार घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही,असे समोर आले आहे. दुसरीकडे 1 ऑक्टोबर रोजी 62.50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे हॉटेल आणि मिठाई व्यावसायिकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
 
gas
नागपूर – घरगुती 993.50 रुपये, व्यावसायिक 2,988.50 रुपये
मुंबई – घरगुती सिलेंडर 941.50 रुपये तर व्यावसायिक सिलेंडर 2,764.50 रुपये
पुणे – घरगुती 945 रुपये, व्यावसायिक 2,825 रुपये
कोल्हापूर – घरगुती 944.50 रुपये, व्यावसायिक 2,788 रुपये
नाशिक – घरगुती 945.50 रुपये, व्यावसायिक 2,840.50 रुपये
छ. संभाजीनगर – घरगुती 950.50 रुपये, व्यावसायिक 2,869.50 रुपये
नांदेड – घरगुती 967.50 रुपये, व्यावसायिक 2,897 रुपये
अमरावती – घरगुती 975.50 रुपये, व्यावसायिक 2,924.50 रुपये
जळगाव – घरगुती 947.50 रुपये, व्यावसायिक 2,854 रुपये
अहिल्यानगर – घरगुती 955.50 रुपये, व्यावसायिक 2,855 रुपये