पुणे,
maharashtra-mlc-election-results-2026राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या 28 तासांपासून अद्यापही मतमोजणी सुरु आहे. मात्र 5 जागांपैकी एका जागेचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातुन भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे सचिन सानप आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात लढत झाली.
पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अजूनही मतमोजणी सुरु आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात सामना आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात चुरस आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक, अदिती पोहरे, संगिता शिंदे आणि दत्तात्रय लहाने हे उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये ५ पैकी एका जागेचा म्हणजे पुणे शिक्षक मतदार संघातून भाजपनं बाजी मारली असून इतर ४ मतदारसंघाचा निकाल प्रतीक्षेत आहे.