नवी दिल्ली,
Microsoft Layoffs जगभरात आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांच्या यादीत असलेल्या मायक्रोसॉफ्टनं कर्मचारी कपातीचा प्लॅन बनवला आहे. कंपनीनं जवळपास 60 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर दिली आहे. याबदल्यात कंपनीनं कर्मचाऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मायक्रोसॉफ्ट आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या युगात कामाच्या पद्धतीत बदल करण्याचा आणि कर्मचाऱ्यांच्या टीममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की अमेरिका, कॅनडा, भारत आणि ब्रिटनमधील निवडक टीमचे उपाध्यक्ष आणि त्यापेक्षा कमी पदांवर काम करणाऱ्यांना नोकरी सोडण्याच्या ऑफरसाठी योग्य ठरवलं जाईल. डेटा सेंटर, सेल्स आणि मार्केटिंग सारख्या काही टीममधील कर्मचाऱ्यांचा यात समावेश नसेल.
मायक्रोसॉफ्टचे मुख्य पीपल ऑफिसर एमी कोलमॅन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये म्हटलं की जे कर्मचारी कंपनी सोडण्याचा विचार करत असतील त्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत आणि नोकरी सोडण्याचा पर्याय मिळेल. त्या कर्मचाऱ्यांना नोकरी संपुष्ठात आल्यानंतर मिळणाऱ्या भरपाईसारखं पॅकेज मिळेल.
मायक्रोसॉफ्टच्या मते ते अशा कर्मचाऱ्यांवर लक्ष देत आहेत जे कंपनीसमोरील तांत्रिक आव्हानं सोडवण्यात योगदान देतील.काही प्रकरणात कंपनी नोकरी सोडण्याचा प्रस्ताव स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करु शकते. यासाठी त्या कर्मचाऱ्यांकडे टॅलेंड असणं आवश्यक आहे. कंपनीच्या या निर्णयामुळं हे स्पष्ट होतं की एआयचा वापर वाढत असताना टेक सेक्टरमध्ये नवे तंत्रज्ञान नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर आणि भरती प्रक्रियेतील धोरणात देखील बदल होत आहेत.