ब्रेकअपचा राग; प्रेयसीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
nagpur crime news प्रेमसंबंध संपवल्याचा (ब्रेकअप) राग मनात धरून प्रेयसीच्या आईला फोन करत तिचे पूर्वीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवकाविरुद्ध पाचपावली पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शिखल अनिल रामटेके (२९, रा. बेजनबाग, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे.
 

nagpur crime news man booked for threatening to viral ex-girlfriend 
पीडित तरुणी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या तक्रारीनुसार, २०१५ ते २०२२ या काळात तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. या काळात आरोपी तिच्यावर संशय घेत शिवीगाळ करायचा, तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले आणि त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. मात्र, आरोपीने दुसऱ्या मोबाइल क्रमांकांवरून संपर्क साधून nagpur crime news  तिला त्रास देणे सुरूच ठेवले. तसेच तिच्या कार्यालयाबाहेर पाठलागही केला. दरम्यान, २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आरोपीने पीडितेच्या आईला फोन केला. पूर्वी तरुणीसोबत काढलेले अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.