नागपूर
nitesh karale नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत आता ‘कराळे फॅक्टर’ निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी मिळविलेल्या २४ हजार २४९ मतांपैकी दुसऱ्या पसंतीची मते कोणाच्या पारड्यात अधिक पडतात, यावर भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असून, आतापर्यंत १४ उमेदवार एलिमिनेट झाले आहेत. या प्रक्रियेत सुधाकर कोहळे यांची पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये असलेली ४ हजार २९१ मतांची आघाडी काही प्रमाणात कमी झाली आहे.
दरम्यान, *थोड्याच वेळात नितेश कराळे यांच्या २४ हजार २४९ मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होणार आहे*. या मतांचे हस्तांतरण कोणत्या उमेदवाराला अधिक फायदा मिळवून देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कराळे यांच्या मतांमधून nitesh karale अभिजीत वंजारी यांना अधिक मते मिळाल्यास काँग्रेसच्या विजयाची शक्यता बळावू शकते, तर सुधाकर कोहळे यांच्या पारड्यात अधिक मते पडल्यास भाजपची आघाडी पुन्हा वाढू शकते. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ‘कराळे फॅक्टर’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे चित्र आहे.