रानगव्यांच्या कळपासाठी रेल्वेचा वेग मंदावला

लोको पायलटचे प्रसंगावधान

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर,
presence-of-mind-of-the-loco-pilot धावत्या रेल्वेसमोर अचानक रानगव्यांचा कळप आल्याने लोको पायलटने प्रसंगावधान राखत रेल्वेचा वेग कमी केला. रानगव्यांना सुरक्षितपणे रेल्वे रुळ ओलांडता यावा यासाठी त्यांनी रेल्वे थांबवून त्यांचा मार्ग मोकळा करून दिला. बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावरील ही घटना लोको पायलट पप्पू शर्मा यांनी आपल्या भ्रमणध्वनी कॅमेर्‍यात टिपली आहे.
 
 
presence-of-mind-of-the-loco-pilot
 
रेल्वे रुळांवर रानगव्यांचा कळप दिसताच शर्मा यांनी रेल्वेचा वेग कमी केला. त्यानंतर रानगव्यांचा कळप सुरक्षितपणे रुळ ओलांडून गेल्यावर रेल्वेने पुढील प्रवास सुरू केला. रेल्वे अपघातांमध्ये वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. यापूर्वी रेल्वे अपघातात 27 रानगव्यांचा मृत्यू झाला आहे. या पृष्ठभूमीवर रानगव्यांचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली ही खबरदारी महत्त्वाची ठरते. वन्यजीवांचे संरक्षण केवळ वनविभागाचीच नव्हे, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि दाखवलेली संवेदनशीलता वन्यप्राण्यांचे प्राण वाचवू शकते, असा सकारात्मक संदेश या घटनेतून मिळतो.