राजस्थान
Omprakash Bishnoi सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, व्हिडिओंना मिळणारा मोठा प्रतिसाद आणि प्रसिद्धी असूनही निवडणुकीत मतदारांचा विश्वास जिंकता येईलच, असे नाही. राजस्थानमधील प्रसिद्ध ज्योतिषी आणि यूट्यूबर ओमप्रकाश बिश्नोई यांना याचा अनुभव आला आहे. सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असलेल्या बिश्नोई यांनी आपल्या गावातून सरपंचपदाची निवडणूक लढवली; मात्र त्यांना अवघी ३३ मते मिळाली. सुमारे १,६०० मतदार असलेल्या गावातील या निकालाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
जोधपूर जिल्ह्यातील ओसियां तालुक्यात असलेल्या इंदों की ढाणी-२ ग्रामपंचायतीतून ओमप्रकाश बिश्नोई निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. इन्स्टाग्रामवर त्यांचे १४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर त्यांना २ लाख ३२ हजार लोक फॉलो करतात, तर यूट्यूबवर त्यांच्या चॅनेलचे सुमारे साडेपाच लाख सबस्क्रायबर्स आहेत. याशिवाय, ते स्थानिक गोशाळेचे अध्यक्षही आहेत. एवढी लोकप्रियता