मुंबई,
rajshree-lottery-diwali-31-lakh-prizeदिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांसाठी राजश्री लॉटरीतर्फे आकर्षक गॅरंटीड बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य, प्रथम क्रमांक केवळ विक्री झालेल्या तिकिटातूनच काढला जाणार आहे. अवघ्या १०० रुपयाच्या तिकिटाद्वारे ३१ लाखांचे गॅरंटीड प्रथम बक्षीस जिंकण्याची संधी या योजनेतून ग्राहकांना मिळणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठ्या बक्षिसाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना विशेष आकर्षण ठरत आहे.

या योजनेत १०० रुपयाच्या तिकिटावर ३१ लाखांचे प्रथम बक्षीस गॅरंटीड जिंकण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षीसे ही जिंकण्याची संधी या योजनेत देण्यात आली आहे, असे यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना राजश्री लॉटरीचे मुंबई विभागाचे प्रमुख मयूर लखानी आणि शरद जाधव यांनी सांगितले. योजनेसाठी सुमारे तीन लाख तिकिटांची तयारी करण्यात आली आहे. राजश्री लॉटरीने ग्राहकांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. राजश्री लॉटरीच्या माध्यमातून अनेक ग्राहक करोडपती व लखपती झाले असून, या यशामुळे ग्राहकांचा राजश्री लॉटरीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. ग्राहकांना आकर्षक बक्षिसांची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती पोहोचवणे यावर कंपनीचा भर आहे.
दिवाळीच्या पृष्ठभूमीवर ग्राहकांमध्ये या विशेष योजनेबाबत उत्सुकता दिसून येत आहे. ग्राहकांनी तिकीट खरेदी करण्यापूर्वी योजनेची अधिकृत माहिती, नियम व अटी आणि लागू असलेले नियम तपासून घ्यावेत.