पाणीपुरवठा विहिरीवरील खासगी मोटारपंप काढा

गंगापूर ग्राम पंचायत प्रशासनास निवेदन

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड,
water-supply-wells गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शयता असताना, तालुयातील गंगापूर येथील एकमेव पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर खासगी विद्युत मोटारपंप बसवून ओलितासाठी पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारंजा येथील एक व्यक्ती सदर विहिरीत मोटारपंप टाकून पाण्याचा उपसा करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, हा पंप तातडीने काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
water-supply-wells
 
गंगापूर गावात सार्वजनिक वापरासाठी दुसरी विहीर उपलब्ध नसून, गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार पाणीपुरवठा योजनेची एकमेव विहीर आहे. गावात तसेच गावाच्या शेतशिवारात अन्य कोणताही पुरेसा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने या विहिरीवरच ग्रामस्थांची भिस्त आहे. अशा परिस्थितीत याच विहिरीतून शेतीच्या ओलितासाठी पाणी उपसा होत असल्यास गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणे ही प्राथमिक गरज असताना, सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या विहिरीतील पाण्याचा खासगी वापर होणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विहिरीतील पाण्याचा अनियंत्रित उपसा सुरू राहिल्यास भविष्यात गावकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विहिरीची पाहणी करावी आणि नियमबाह्य पाणीउपसा होत असल्याचे आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
यासंदर्भात ग्रामस्थांनी २७ ऑटोबर रोजी सोमठाणा ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. गंगापूरच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील विद्युत मोटारपंप काढून टाकण्यात यावा, जेणेकरून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.गावाच्या मूलभूत पाणीगरजेला प्राधान्य देऊन ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाहणी करावी आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निवेदनावर शेषराव चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.