विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर 'या' देशात १५ वर्षांनी सत्तापालट

मध्य युरोपातही "झुरळां"!

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
बेलग्रेड,
serbia-student-movement-युरोपमधील अनेक देश सध्या निदर्शनांमध्ये होरपळत असल्याचे चित्र आहे. फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांमध्ये शिक्षण, रोजगार आणि महागाईच्या मुद्यावर सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. भारतातही 'कॉकरोच जनता पार्टी'च्या पुढाकाराने आंदोलने सुरू आहेत. अशातच आता, एक मोठी घटना जागतिक राजकीय पटलावर झाली आहे. मध्य युरोपातील सर्बियामध्ये तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या राजकीय क्रांतीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्बियात पेटलेल्या आंदोलनाने अखेर लोकशाही मार्गाने तिथली सत्ता बदलून टाकली आहे.
 
 
sarebia
गेली १५ वर्षे देशावर वर्चस्व गाजवणारे दिग्गज नेते आणि राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून, तरुण आंदोलकांनी पाठिंबा दिलेल्या 'कॉकरोच' म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आघाडीने मोठा विजय मिळवला आहे.
 
सर्बियातील संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीचा पराभव झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भ्रष्टाचार आणि लोकशाही संस्था कमकुवत करण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणाऱ्या ‘स्टुडंट्स लिस्ट’ या विरोधी युतीने २५० सदस्यांच्या संसदेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा पाठिंबा असलेल्या वुकिक यांनी या आंदोलनाला परकीय शक्तींचे षड्यंत्र म्हटले होते, मात्र जनतेने त्यांचा हा दावा फेटाळून लावला.
 
बेलग्रेडसह प्रमुख शहरांत तुफान जल्लोष
निकालाचे चित्र स्पष्ट होताच राजधानी बेलग्रेडसह सर्बियातील शहरांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा केला. गाड्यांचे हॉर्न वाजवून, गाणी गाऊन, घोषणा देऊन समर्थकांनी परिसर दुमदुमून टाकला. बेलग्रेडच्या सेंट्रल पार्कमध्ये वुकिक समर्थकांनी वर्षभरापासून ठोकलेले तंबू आणि बॅरिकेड्स लोकांनी हटवायला सुरुवात केली. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ चकमकीच्या घटना घडल्याने खबरदारी म्हणून मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाभोवती दंगल नियंत्रण पथके आणि विशेष वाहने तैनात करण्यात आली होती.