नवी दिल्ली
da hike केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी दिवाळीपूर्वीच मोठा आनंदाचा क्षण आला आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने महागाई भत्ता (डीए) वाढवण्याची घोषणा केली आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्राने महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली असून यासह एकूण भत्ता ६३ टक्के झाला आहे. यासाठी सरकारने 10,016 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारी कर्मचारी बऱ्याच काळापासून याची प्रतीक्षा करत होते. अखेर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे कर्मचाèयांचा महागाई भत्ता ६० टक्क्यांहून ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्याचा आढावा घेते. साधारणपणे जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यांपासून सुधारित दर लागू केले जातात. यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ मंजूर केली होती. त्यामुळे हा दर ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला. ती वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली होती. तर आता नवीन वाढ १ जुलै २०२६ पासून लागू असेल.