वर्धा जिल्ह्यातील २.३८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पाच हजारांची अग्रीम मदत

शासन आदेश निर्गमित

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
वर्धा,
Farmers यंदा अल्प पर्जन्यमान व पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवालदिल शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. २७ ऑक्टोबर रोजी शासनाने ५ हजारांच्या अग्रीम मदतीचा आदेश निर्गमित केला आहे. जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ६५० खातेधारक शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच ५ हजारांची रक्कम जमा होणार आहे.
 

Wardha: 2.38 Lakh Farmers to Receive ₹5,000 Advance Relief Before Diwali 
जिल्ह्यातील ७ तालुक्यांचा दुष्काळी ट्रिगर-१ मध्ये समावेश केल्यानंतर शेत पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळी ट्रिगर-२ मध्ये समावेश करण्यात आला. अल्प पर्जन्यमान व पावसाच्या खंडाचा जिल्ह्यातील १३५४ गावांना फटका बसला असून २ लाख ३८ हजार ६५० शेतकरी बाधित झाले. संयुक्त पंचनाम्यांअंती जिल्ह्यातील २ लाख ६९ हजार १३३.०२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. संबंधित अहवाल १६ ऑक्टोबरला जिल्हा प्रशासनाने सादर केला. आता शासन स्तरावरून हवालदिल शेतकर्यांना ५ हजारांची अग्रीम मदत देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
तालुकानिहाय बाधित शेतकरी अन् नुकसान
तालुका : बाधित शेतकरी : ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र
वर्धा : ३२६५५ : ३६८९४.८० हेक्टर
सेलू : २७४९२ : २८६४३.६६ हेक्टर
देवळी : ३०६१९ : ३२३८५.४० हेक्टर
आर्वी : २६३७१ : ३२५६५.६९ हेक्टर
आष्टी : १७८४६ : १४१०२.४७ हेक्टर
कारंजा : २५२७१ : २७३६१.२३ हेक्टर
हिंगणघाट : ४०३८८ : ४९४१० हेक्टर
समुद्रपूर : ३८००८ : ४७७६९.७७ हेक्टर