मुंबई,
tukaram-mundhe-fda-diwali-actionएफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी आतापर्यंत शेकडो कारवाया केल्या आहेत. सध्या सणासुदीचा काळ आहे. मिटाई, फरसाण अशा खाद्यपदार्थांची या काळात मोठी विक्री होते. हीच बाब लक्षात घेऊन आता तुकाराम मुंढे यांनी नवी मोहीम उघडली आहे. थेट पत्रकार परिषद घेऊन तुकाराम मुंढे यांनी याबाबत माहिती दिलीय. दिवाळीच्या काळात एफडीएकडून नेमकं काय काय केलं जाणार? याची माहिती त्यांनी दिलीय.
तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती दिली. तसेच सध्याच्या सणासुदीच्या काळात एफडीए काय कारवाई करणार, याबाबतही त्यांनी सांगितले. दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे आता आम्ही कारवाईचा वेग वाढवणार आहोत. दिवाळीच्या काळात फराळ, मिठाई, चकली, चिवडा आणि इतर वस्तूंची चौकशी केली जाणार आहे. दिवाळी संपेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
सणासुदीच्या काळात आजारांच प्रमाण वाढतं. सणासुदीच्या काळात तारीख निघून गेलेले पदार्थ, दर्जाहीन पदार्थ यांची विक्री केली जाते. त्यामुळेही आजार वाढतात. दिवाळी सण जवळ आल्याने मसाले निर्मिती करणाऱ्या 1057 मसाला आस्थापनांवर कारवाई करून चौकशी करण्यात आली आहे. यात 94 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. 11963 क्विंटल मसाले व मसालेजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मसाल्यांची किंमत 19.69 कोटी रुपये आहे. गोडाऊन आणि कारखान्यांमध्ये ही कारवाई करण्यात आलीय, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.