नागपूर

दिवाळीच्या ४ ते ७ नोव्हेंबर काळातल्या तिकिटांचे दर पाहून प्रवासी हादरले आहेत. कुटुंबासह गावी येणाऱ्या चार जणांना फक्त जाण्यासाठीच ७६ हजार रुपये मोजावे लागणार आहेत, जे नेहमी २२ ते २६ हजारांत व्हायचे.
विशेष म्हणजे, थेट विमान सर्वात स्वस्त व सर्वात जलद आहे. फक्त १ तास २५ मिनिटे. पण, तेच तिकीट नेहमीच्या ६,५०० रुपयांच्या तुलनेत १९,०६८ रुपये आहे. कनेक्टिंग फ्लाईट घेऊन तर प्रवाशांचे दुहेरी नुकसान होत आहे. जास्त पैसे देऊन ४ तास ३५ मिनिटांपासून ते १४ तास २५ मिनिटांपर्यंत प्रवास करावा लागत आहे. म्हणजे वेळही जास्त व पैसाही जास्त.
कंपन्या दर का वाढवतात?
पुण्यात शिक्षण, नोकरीसाठी असलेले हजारो नागपूरकर दिवाळीत घरी येतात. आता चारजणांच्या कुटुंबाला जाण्या-येण्याचे दीड लाख रुपये लागणार आहेत. यामुळे पुण्यात शिक्षण व नोकरीसाठी असलेले हजारो नागपूरकर विमान प्रवास रद्द करून रेल्वे व बसकडे वळले आहेत.