धानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
धानोरा,
dhanora taluka दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या धानोरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त म्हणून तत्काळ समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी ’युवा कृती समिती, धानोरा’ यांच्या वतीने सोमवारी धानोराचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक संकटातून दिलासा मिळावा आणि शासनाच्या दुष्काळ निवारण योजनांचा लाभ मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
 

dhanora taluka 
 
 
धानोरा तालुक्यातील अधिकांश नागरिक शेतीवर अवलंबून असून पावसाचे अनियमित प्रमाण, खंड आणि पिकांच्या उत्पादनावर होणार्‍या विपरीत परिणामांमुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.
या अत्यंत कठीण परिस्थितीत तालुक्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश न झाल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सर्व गावामधील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पीक नुकसानीची स्थिती आणि पाण्याची उपलब्धता यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे.dhanora taluka तसेच वस्तुनिष्ठ पंचनामे व सर्वेक्षण करून परिस्थितीचा योग्य आढावा घ्यावा अशी मागणी करीत शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत शासन व प्रशासन उदासीन असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाच्या निकषांनुसार धानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर तत्काळ पाठवण्यात यावा, अशी आक्रमक भूमिका युवा कृती समितीने मांडली आहे.