नवी दिल्ली,
el-nino-heat-death-trackerसुपर एल निनोमुळे जगभरात पावसाचा पॅटर्न बदलत असून तापमान वाढत आहे. याला पाहता आता क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने एक नवीन टुल एल निनो हीट मॉर्टेलिटी ट्रॅकर तयार केले आहे. हे टूल सांगतो की अल निनोच्या उष्णतेने मानवी जातील किती धोका आहे. हा ट्रॅकर दर महिन्याचा डेटा देतो, ज्यात पुढील ६ महिन्यात होणाऱ्या संभाव्य मृत्यूचा अंदाज कळतो.
जून महिन्यापासून एल निनोच्या सुरुवातीनंतर उष्णतेने किती मृत्यू झाले याची माहिती हा ट्रॅकर सांगतो. जगभरातील राज्याचा डेटा उपलब्ध करुन हा टुल फंड देणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना सर्वात प्रभावित क्षेत्राची माहीती देतो. यामुळे हे कळण्यास मदत होते की संसाधनांची सर्वात जास्त गरज कुठे आहे आणि कुठे लोकांचे प्राण वाचवता येऊ शकतात.
आता या ट्रॅकरमध्ये मार्चपर्यंतच्या डेटाचा समावेश केला आहे. यानुसार एल निनोमुळे वाढणाऱ्या तापमानामुळे एकूण ८,५७,००० मृत्यू होऊ शकतात. ज्यात ३,७३,००० मृत्यू येत्या सहा महिन्यात होण्याचा अंदाज आहे. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबचे सह-संस्थापक आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत अर्थशास्रच्या मिल्टन फ्रिडमॅन डिस्टिंग्विश्ड सर्व्हीस प्रोफेसर मायकल ग्रीनस्टोन यांनी सांगितले की आमचा शोध नवीन पूर्वानुमान क्षमतांचा वापर करुन एक खूप अत्यावश्यक प्रश्नाचे उत्तर देतो की भीषण उष्णतेने लोकांचे मृत्यू कुठे होतील ?
त्यांनी सांगितले की भीषण तापमानाच्या परिणामांचा आधीच अंदाज लावता येणे मोठे पाऊल आहे. याचा अर्थ आम्ही हे ओळखू शकतो की कुठे लोकांना सर्वात जास्त धोका आहे आणि लोकांचे प्राण जाण्याआधीच पावले उचलता येतील. ते म्हणाले की हा ट्रॅकर त्या सुपर एल निनो संदर्भात माहिती देतो, ज्याचा सामना आज आपण करत आहोत.