वर्धा,
jagrut drishti कथाकथन, परिसंवाद, व्याख्यान, कविसंमेलन अशा वैवध्यिपूर्ण व दर्जेदार उपक्रमांमुळे पूर्णत्व लाभलेल्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या दोन दिवसीय जागृत दृष्टी साहत्यि संमेलनाची सांगता सुरेल गीतगायन मैफलीने करण्यात आली. स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात आयोजित या संमेलनाच्या पहल्यिा सत्रात मतमाच्या तळाशी दिवे लागलेफ या नागपूरच्या विधी महावद्यिालयाचे माजी प्राचार्य डॉ. शिरीष देशपांडे यांच्यावरील चरत्रिात्मक पुस्तकावर परिसंवाद घेण्यात आला. परिसंवादात डॉ. विनिता हिंगे यांनी मोजया व प्रभावी शब्दात या पुस्तकातील भाववश्वि उलगडले.
द्वितीय सत्रात ज्येष्ठ हिंदी कथाकार घनश्याम आसुदानी (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बहुआयामी कथाकथनात रेवानंद मेश्राम, अभिजित डाखोरे, प्रा. डॉ. सुचिता ठाकरे, प्रा. मीनल रोहणकर व साधना उमाळकर यांनी ओघवत्या शैलीत कथा सादर केल्या. सायंकालीन सत्रात ज्येष्ठ गझलकार व लेखक काशिनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कविसंमेलन घेण्यात आले. कविसंमेलनात ज्ञानेश्वर वर्हाडे, गंगाधर मुटे, प्रीती तडस-वाडीभस्मे, मंजुषा ठाकरे चौगावकर, कविता बेदरकर, वृषाली मरतोडे, राहुल राऊत, स्वाती सगरे, अॅड. इब्राहिम बश आझाद, नरेंद्र गंधारे, सुरेश सुरजुसे, गझलकार अजीजखान पठाण, राजेंद्र कांबळे, छत्रपाल तामगाडगे, सुरेश वंजारी, सूर्यकांत मुनघाटे, चरणदास वैरागडे, नरेश पाटील, शरद कांबळे यांनी दर्जेदार कविता व गझल सादर करीत रसिकांची दाद मिळवली. संमेलनाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनीही यावेळी हिंदी काव्यरचना सादर केली.
संमेलनाच्या दुसर्या दिवशी सिनेनाट्य दग्दिर्शक तथा नाम फाउंडेशनचे समन्वयक हरिष इथापे यांनी ममन, मेंदूला अनलॉक करू याफ या विषयावर प्रेरणादायी संवाद साधत नवोन्मेषशाली विचारांची मांडणी केली.
संमेलनाच्या समारोप सत्रात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सहभागी साहत्यिकि व आयोजन समितीतील कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.jagrut drishti या संमेलनाची सांगता मसूरसंगम गीतगुंजनफ मैफलीने झाली. कार्यक्रमात जियाउद्दीन शेख, पूजा शेंदरे, लीला लाकडे, प्रशांत देऊळकर यांच्यासह संगीता इंगळे, ज्योती भगत, मकरंद उमाळकर यांनी सुरेल गाणी सादर केली. यशस्वितेसाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष भोजराज पाटील, महासचिव डी. पी. जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र देवरे, कोषाध्यक्ष डी. एन. मरडे, राष्ट्रीय सचिव जगदीप कवाळ, संमेलन समन्वयक नरेंद्र नरोटे यांनी परश्रिम घेतले.