अनिल कांबळे
नागपूर,
murder accused rapes खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या कैथवास याच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरुणी तीन महिन्यांची गर्भवती असताना आरोपीने तिला औषध दिले. त्यामुळे गर्भपात झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैथवास याला २०१४ मधील एका खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कारागृहात असताना त्याची ओळख पीडित तरुणीच्या भावाशी झाली होती. कैथवास पॅरोलवर सुटल्यानंतर तरुणीच्या भावाने तिला त्याची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत कैथवासची भेट घेतली. यावेळी आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या आमिषातून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही त्याने अनेकदा तिचे लैंगिक शोषण केल्याने ती गर्भवती झाली.murder accused rapes तरुणीला तीन महिन्यांची गर्भवती असताना आरोपीने तिला औषध दिले. त्यामुळे गर्भपात झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तरुणीने २७ ऑक्टोबर रोजी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार कैथवासविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.