भुवनेश्वर,
odisha-cyclone-931-babies-bornअर्णब चक्रीवादळादरम्यान ओडिशामध्ये ९३१ बाळांचा जन्म झाला. वादळानंतर अनेक पालकांनी आपल्या मुलांची नावे अर्णब आणि मुलींची नावे वर्षा ठेवली. चक्रीवादळापूर्वी २,२४५ गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते.
या कालावधीत ९३१ महिलांनी बाळांना जन्म दिला. माता आणि बाळे दोघेही निरोगी आहेत, असे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी बुधवारी सांगितले. गंजाम जिल्ह्यातील पात्रापूर येथे सुकांत प्रधान यांनी एका मुलाला जन्म दिला. कुटुंबाने त्याचे नाव ‘अर्णब’ ठेवले आहे. दरम्यान, चिकराडा येथे रुक्मिणी बेहरा यांनी वर्षा राणी नावाच्या मुलीला जन्म दिला.
याशिवाय, काही कुटुंबांनी आपल्या मुलांची नावे ‘तुफान’ आणि ‘पवन’ आणि मुलींची नावे ‘बतासी’ ठेवली आहेत. गंजम जिल्ह्यात प्रशासनाने २५ ऑक्टोबरपासून ४९३ गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल केले होते. यापैकी बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत २२० महिलांनी बाळांना जन्म दिला.