पाकिस्तानात 14.6% वरून आता केवळ 1.7% हिंदू!

ब्रिटीश संघटनेचा धक्कादायक अहवाल

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
pakistan-hindu-population-declineआपला शेजारील देश पाकिस्तानात हिंदूंची संख्या आता केवळ १.७ टक्के उरली आहे. ब्रिटीश हिंदू संघटना इनसाईट युकेने आपल्या अहवालात ही धक्कादायक माहिती दिली आहे. १९४१ मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या १४.६ टक्के होती. हिंदूंची लोकसंख्या घटण्यामागे हिंसा आणि धर्मांतरण जबाबदार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आणि त्यानंतर हजारो हिंदू कुटुंबांना आपले घर सोडावे लागले होते. अनेक कुटुंबांची वडिलोपार्जित जमीन आणि शेती देखील हिसकावली गेली.
 
 
hindu
 
या अहवालात धार्मिक स्वातंत्र्यावर बंदी आणि जबरदस्तीने केलेले धर्मांतरावर देखील बोट ठेवण्यात आले आहे. संघटनेने ब्रिटीश सरकारकडे पाकिस्तानात अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेसंदर्भात पावले उचलण्याची मागणी केली आहे. रिपोर्टनुसार १९४७ फाळणीदरम्यान आणि त्यानंतर झालेल्या हिंसेत हजारो हिंदू कुटुंबे विस्थापित झाली. अनेक कुटुंबांनी आपली वडिलोपार्जित जमीन आणि शेती गमावली. अहवालात दावा केला आहे की पाकिस्तानच्या एनिमी प्रॉपर्टी कायद्यांतर्गत या संपत्तीवरील कब्ज्याने हिंदू समुदायाची आर्थिक स्थिती कमजोर झाली.
 
अहवालात म्हटले आहे की पाकिस्तानच्या संविधानाच्या परिशिष्ट ४१ आणि ९१ चा उल्लेख केला आहे. या अंतर्गत राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान पदावर केवळ मुस्लीम नागरिकांचा अधिकार आहे. या नियमांना बदलण्यासाठी २०१९ मध्ये आणलेले सुधारणा विधेयक पुढे जाऊ शकले नाही. संघटनेने हे देखील म्हटले आहे की पाकिस्तानात पासपोर्ट तयार करताना नागरिकांना त्यांचा धर्म सांगावा लागतो. इस्लामाबाद येथे हिंदू मंदिर तयार करण्याची योजना देखील आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. रिपोर्टनुसार २०२० मध्ये मंदिर निर्मितीला मंजूरी मिळाल्यानंतर इस्लामी संघटनांच्या विरोधामुळे या मंदिराचे काम थांबवण्यात आले आहे.