परिश्रम ,निष्ठा असली तर जीवनात यश साध्य होते : गायत्रीताई विप्रदास

राष्ट्रसेविका समिती नगर बुलढाणा विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
बुलढाणा
samiti-buldhana-vijayadashami जीवनातील कुठलेही यश साध्य करण्यासाठी साधना करणे फार आवश्यक आहे. व्यक्तीच्या जीवनाच्या विकासाकरीता मग ते व्यक्तीगत असो सामाजिक कींवा राष्ट्राप्रती एखादी गोष्ट जर आपल्याला साधायची असेल तर त्यासाठी अथक प्रयत्नांची निष्ठा हा खूप आवश्यक आहे. सिमेवर राष्ट्राच रक्षण करण्याकरीता उभा असलेल्या सैनिकांच्या मनात मी माझ्या राष्ट्राच रक्षण करणार हा भाव मनात ठेवून तो कर्तव्यावर असतो त्याचं हे काम म्हणजेच एक प्रकारची साधना आहे. असे विचार राष्ट्र सेविका समितीच्या विदर्भ प्रांत सहकार्यवाहीका गायत्रीताई विप्रदास यांनी व्यक्त केले.
 

samiti bul
राष्ट्र सेविका समिती बुलढाणा नगराचा विजयायदशमी उत्सव दि. २८ ऑक्टोबर रोजी रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी अ‍ॅड. वषार्र् पालकर(बालकल्याण समिती सदस्य बुलढाणा), नगर कार्यवाहीका मीनाताई कुलकर्णी होत्या.
 
प्रमुख वक्त्या गायत्री ताई विप्रदास यांनी सांगितले वंदणीय मावशी, ताई व सेविकांनी केलेली निरंतर साधना व त्यातून उभे राहिलेले समितीचे सर्वव्यापी सर्वस्पर्शी कार्य ९० वर्षा च्या वाटचालीत. समिती कार्याच्या प्रभावातून व सेविकांच्या नित्य संपर्कातून व आचार ,विचार आणि उच्चारतून समाजा मनात परिवर्तन घडून येऊ शकते नारीशक्तीच्या दृढ संकल्पाने विजयादशमीचा उत्सव साजरा करतांना धर्म, संस्कार आणि समाजकार्यातून राष्ट्र निर्मितीचे काम समितीच्या माध्यमातून देशभरात सुरु असल्याचे सांगून आगामी काळामध्ये समितीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी समयदान , प्रवास, संपर्क, वाचन व काळानुरूप बदल करत समाजापर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
उत्सवाची प्रारंभी शस्त्रपूजन व समितीचे आराध्य देवी अष्टभुजा वं. मावशी व ताईंच्या प्रतिमेस पुष्पार्चण करून झाली. समिती प्रार्थनेने , भगव्या ध्वजाला वंदन करण्यात आले.
 
चैतन्य शाखेच्या बालसेविकांनी नियुद्ध व दंडाचे सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. गृहिणी शाखेच्या सेविकांनी टाळ योग प्रात्यक्षिका द्वारे मासाहेब जिजाऊंना वंदन केले. श्लोक ऋतुजा सपकाळ, अमृत वचन देवश्री डांगे, वैयक्तीक गीत सुवर्ण देशमुख स्फूर्तीदायक श्लोक व अमृतवचन व गीताने वातावरण प्रसन्न झाले. या कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर, संघ बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय दिपाली देशपांडे यांनी केले.