राज्य शासनाने तीन पिढ्यांची अट शिथिल करावी

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
चामोर्शी, 
state government तालुक्यातील भाडभीडी येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली जिल्हा गडचिरोली व संयुक्त वन व्यवस्थापन समिती भाडभीडी यांच्या संयुक्त विद्यमाने भाडभीडी येथे वनदावा करणार्‍या सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍न बाबत माहिती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये वनदावाबाबत राज्य शासनाने तीन पिढ्यांची अट शिथिल करावी, अशी एकमुखी मागणी शेतकर्यांनी केली.
 

state government 
 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रसहाय्यक चीवाने, मंडळ अधिकारी जाधव , तलाठी येनगंटीवार, ग्रामसेवक प्रकाश कुनघाडकर, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कोवासे, पोलीस पाटील सुरपाम, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ भुरसे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोवासे, मंचू पुंगाटी, वाडीघरे यासह परिसरातील जाणाळा, रेखेगाव, आमगाव, चक न. दोन, अनंतपूर, कुदरसी, जंगमपूर, बिलासपूर, हळदवाही, हळदवाही टोला, मंजेगाव, राजूर बुज, राजूर खुर्द, लाभानतांडा, मक्केपल्ली, चापलवाडा, माडेमुधोली, रेगडी, पोतेपल्ली,माडेआमगाव, विकासपल्ली, घोट, पेटतळा, येथील शेतकर्‍यांच्या वनजमीन व ज्या नागरिकांचे वन दावे व शेती पट्टे शासनदरबारी प्रलंबित आहेत, त्या समस्त गावातील शेतकरी नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रणय खुणे, दीपक सुनतकर यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, संदीप भोवरे, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय मानवाधिकार संघटन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद किरमे, श्रीकांत वैरागडे, सचिन देशमुख, गुरुदेव सातपुते, व भाडभीडी येथील युवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले.