नगर रचना विभागाला कार्यालयीन कामकाजासाठी जागेची गरज

चारही बाजूने बांधलेल्या गठ्ठयात हितभर जागेत कर्मचार्‍यांचा कोंडमारा

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
बुलढाणा
town-planning-department जिल्ह्यातील शहरांचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करणार्‍या नगर रचना विभागाला स्वतःच्या कार्यालयाची सुयोग्य रचना करणे अद्यापही जमलेले नाही. कार्यालयात विविध जमिनींचे नकाशे प्लॉट धारकांचे कागदपत्र ठेवण्यासाठी कार्यालयाची जागा कमी पडत आहे. बुलढाणा नगर रचना विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून २१ जण कार्यरत आहे. केवळ छोट्याशा जागेत कार्यालयाच्या बाबतीत मात्र नगर रचना विभागाचा दर्जा नसल्याचे स्पष्ट दिसून येते. जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देवून नगर रचना विभागाला त्यांच्या मागणीनुसार वाढीव जागा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
 

town planning
नियोजनबद्ध विकास करणे, बांधकामांना नियमांनुसार परवानगी देणे आणि शहरातील जमिनींचा योग्य वापर सुनिश्चित करणे आहे. याशिवाय नवीन इमारती, घरे, व्यावसायिक संकुले आणि इतर बांधकामांचे नकाशे नियमांनुसार तपासून मंजुरी देण्याची प्रक्रिया राबवण, निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि सार्वजनिक वापरासाठी जमिनीचे नियोजन करणे, झोन दाखले व बांधकामविषयक जमिनीचा वापर कोणत्या प्रवर्गात येतो, याबाबत माहिती किंवा आवश्यक दाखले देणे, अशी महत्वाची कामे सदर विभागाची आहे. बुलढाण्याचे नगर रचना कार्यालय प्रशासकीय इमारतीमधील खोली क्र. ७ मध्ये कार्यरत आहे.
 
या कार्यालयात तांत्रिक विभाग, चित्रण विभाग, आस्थापना विभाग आणि सर्व प्रकारचा अभिलेख जतन करण्याकरिता अभिलेख कक्ष असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत या कार्यालयात जर कुणी गेले तर त्यांच्या लक्षात येईल की, सदर अभिलेखांचे गड्ढे सर्वत्र पडलेले आहेत. उरल्या सुरल्या जागेत २१ कर्मचारी काम करीत आहेत. ही जागा केवळ एक हजार स्क्वेअर फूट आहे. अशातच जर कार्यालयीन कामाकरिता येणार्‍या अभ्यागंतांना उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठीही जागा नसल्यामुळे मोठी गैरसोय होते. सदर मागणी मागील पाच वर्षांपासूनची आहे. या दरम्यान चार जिल्हाधिकारी बदलले, परंतु कुणीही याची दखल घेतलेली नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनासोबत नगर रचना विभागाने वारंवार पत्रव्यवहार केला आहे.
 
नगर रचनाच्या सहाय्यक संचालक वैशाली गाठे यांनी जिल्हाधिकार्‍यांना कळविले आहे की, नगर रचना कार्यालयाला लागून मत्स्य व्यवसाय विभाग आहे. या कार्यालयाला जर इतरत्र जागा उपलब्ध करून दिल्यास नगर रचना कार्यालयाची जागेची गरज भागू शकते. रोजचे नवे आराखडे अभिलेखात रूपांतरीत होत आहे. आणखी काही दिवसांनी जे आहेत, त्या कर्मचार्‍यांनाही बसण्यासाठी जागा नाही जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे यांनी नगर रचना विभागाच्या जागेचा तात्काळ मार्गी लावावा अशी अपेक्षा आहे.