मुंबई,
upheaval-at-mumbai-indians आयपीएलच्या आगामी २०व्या हंगामासाठी सर्वच संघांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षकांच्या चमूमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. संघाच्या कोचिंग सेटअपमधून दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही हंगामांतील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सने आपल्या संघव्यवस्थेत बदल करण्यावर भर दिला आहे.
यापूर्वी महेला जयवर्धने यांनी मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्ड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर आता प्रशिक्षकांच्या चमूमध्ये आणखी बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षक रचनेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
मलिंगाचा मुंबई इंडियन्ससोबतचा दीर्घ प्रवास
लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्सच्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. खेळाडू म्हणून त्याने संघासाठी अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या. मुंबई इंडियन्सच्या चार आयपीएल विजेतेपदांमध्ये तसेच २०११ मधील चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेतील विजेतेपदात त्याचे योगदान महत्त्वाचे होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मलिंगाने पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात प्रवेश केला आणि मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. त्यामुळे त्याची प्रशिक्षकांच्या चमूतून झालेली एक्झिट हा मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल मानला जात आहे.
पारस म्हाम्ब्रे यांचाही मुंबई इंडियन्ससोबत दीर्घ संबंध राहिला आहे. त्यांनी २०१० ते २०१७ या कालावधीत फ्रँचायझीसोबत काम केले होते. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षण चमूमध्ये प्रवेश केला. आता मलिंगासोबतच म्हाम्ब्रे यांचीही प्रशिक्षकांच्या चमूतून एक्झिट झाली आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सनही बाहेर मुंबई इंडियन्सच्या कोचिंग सेटअपमधून बाहेर पडणारे तिसरे नाव कार्ल हॉपकिन्सन यांचे आहे. ते २०२५ च्या हंगामापूर्वी संघाच्या प्रशिक्षण चमूत सहभागी झाले होते. त्यांच्याकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी होती. मात्र, आगामी हंगामापूर्वी फ्रँचायझीने त्यांच्यासोबतचा करार संपुष्टात आणल्याचे वृत्त आहे.
आता मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांच्या चमूमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी संघ आपल्या कोचिंग सेटअपमध्ये आणखी कोणते बदल करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. आगामी आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्स नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.