खरीप हातचा गेला..! आकाशात ढग, पण पाऊस नाही

शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे; रब्बी धोक्यात

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
नागपूर,
vidarbha-drought-kharif-crop-lossऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेला आहे. जवळपास अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने विदर्भासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठला व बोअरवेलही कोरडी पडली आहेत. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या; मात्र दिवसभरात पावसाचा एक थेंबही न पडल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत आणि निराशा अधिक गडद झाली आहे.
 
 
sdf
जिल्ह्यात यंदा पावसाच्या दीर्घ खंडाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला व शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली. तब्बल ७५ दिवसांपासून पाऊस नाही. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पावसाने दडी मारल्याने उत्पादनात ५० ते ७० टक्के घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
शेतकरी संकटात
पेरणी - ५ हजार रुपये एकर
खते - ८ हजार रुपये
औषधे - ४ हजार रुपये
मशागत - ६ हजार रुपये
असा एकरी २३ हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्याने केला आहे. पण पीक हातातून गेल्याने हा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. बँकेचे कर्ज, सावकाराचे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत शेतकरी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवायला सुरुवात केली आहे.
 
 
रब्बीही निम्म्यावर येणार
खरीप गेला, आता रब्बीची चिंता. ऑक्टोबरमध्ये रब्बीसाठी पेरणी होते. गहू, हरभरा, जवस यासाठी ओलावा लागतो. पण विहिरीत पाणी नाही, प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्र ५० टक्के कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी अधिकारी म्हणतात, ‘ओलावा नाही, तर पेरणी कशी करणार?
 
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटणार दुसरीकडे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. जिल्ह्यातील १२ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा केवळ २८ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ७८ टक्के साठा होता. बोअरवेल कोरडे पडल्याने अनेक गावांमध्ये टँकरची मागणी सुरू झाली आहे.
गुरुवारचा दिवस, आशा दाखवून निराशा
गुरुवारी सकाळपासून वातावरणात बदल जाणवत होता. आकाशात ढगांची दाटी झाली होती. उन्हाची प्रखरता कमी झाली होती. वारा सुटला, विजा चमकल्या. शेतकरी शेतात धावले. ‘ चांगला पाऊस येणार, पीक वाचणार‘ अशी आशा निर्माण झाली होती. दुपारी २ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी थोडा पाऊसही पडला. पण जमीन भिजली नाही. सायंकाळपर्यंत कुठेही पावसाचा थेंब पडला नाही. ढग निघून गेले.
चौकट
शेतात उभी पिके व अवस्था
कापूस - कापसाला बोंड लागण्याच्या अवस्थेत पाणी हवे. पाणी नाही म्हणून बोंडं सुकत आहेत, पातीगळ होत आहे.
तूर - तूर फुलोऱ्यात आहे. पाण्याअभावी फुले गळत आहेत.
सोयाबीन- सोयाबीन पीकाला पाण्याची गरज असताना पाऊस माघारी.
हळद - हळदीला पाणी लागते वाढीच्या अवस्थेत. पाणी नाही म्हणून पाने पिवळी पडून करपू लागली आहेत.
धान- धान्याला पाणी न मिळाल्याने धान पूर्णपणे भरलेच नाही.