नागपूर,
Abhijit Vanjari is the Congress candidate. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी यांना पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अभिजित वंजारी यांच्या उमेदवारीला मंजुरी दिली आहे.काँग्रेसकडून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासोबतच पुणे विभाग शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठीही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत दिनकर असगावकर, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या तिन्ही उमेदवारांच्या नावांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजुरी दिल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील आगामी विधानपरिषद निवडणुकीत अभिजित वंजारी हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.