रीती तिवारीचा 'बॉम्ब ब्लास्ट' पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात येणार?

सलमानच्या एका वाक्याने वाढली उत्सुकता

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
मुंबई
bigg boss 20 ‘बिग बॉस 20’च्या घरात सध्या ड्रामा, भावनिक प्रसंग आणि अनपेक्षित ट्विस्टमुळे वातावरण चांगलेच रंगले आहे. निर्मात्यांकडून सातत्याने नवनवीन डाव खेळले जात असल्याने घरातील घडामोडींवर प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. नुकतेच आठवड्याच्या मध्यात झालेल्या एव्हिक्शननेही प्रेक्षकांना धक्का दिला. विशेष अधिकार मिळाल्यानंतर उदिती सिंह, यंग डीएसए आणि माही विज यांनी चर्चा करून एकमताने मनोज तिवारी यांची मुलगी रीती तिवारीला घराबाहेर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रीतीला अचानक शोमधून बाहेर पडावे लागले.
 

bigg boss 20 
रीतीच्या अनपेक्षित एव्हिक्शनमुळे भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता ‘वीकेंड का वार’च्या आगामी भागाचा प्रोमो समोर आल्यानंतर रीती तिवारीच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानने रीतीच्या एव्हिक्शनवर नाराजी व्यक्त करत घरातील सदस्यांना सुनावले आहे.रीतीला घराबाहेर करण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याची किंवा झालेली चूक सुधारण्याची संधी देण्यात आली नाही, असे सलमानने स्पष्ट केले. प्रोमोमध्ये तो म्हणताना दिसतो की, रीती घरातून बाहेर गेली, त्यानंतर तिने माफीही मागितली; मात्र घरातील सदस्यांनी तिला स्वतःमध्ये सुधारणा करून दाखवण्याची एकही संधी दिली नाही.यानंतर सलमान खानने यंदाच्या ‘बिग बॉस’च्या खास थीमकडे संकेत देणारे एक वाक्य म्हटले. ‘तुम्ही सगळे विचार करत आहात की रीती गेली, बिग बॉसलाही वाटतंय की ती गेली; पण या सीझनची थीम काय आहे? तथास्तु!’ असे सलमान म्हणाला. त्यानंतर त्याने रीती तिवारीला पुन्हा स्टेजवर बोलावले.
रीतीला समोर पाहताच आम्रपाली दुबेचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती आनंदाने उड्या मारताना आणि हसताना दिसली. मात्र, घरातील इतर सदस्यांना रीती अचानक समोर आल्याने आश्चर्याचा धक्का बसला. या प्रोमोमुळे रीतीची पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री होणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मात्र, सलमान bigg boss 20 खानने दिलेला हा संकेत केवळ प्रोमोपुरता मर्यादित आहे की रीती तिवारी खरोखरच स्पर्धक म्हणून पुन्हा घरात प्रवेश करणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे रीतीच्या पुनरागमनाचे गूढ कायम आहे. जर तिची पुन्हा घरात एन्ट्री झाली, तर तिला एव्हिक्ट करण्याचा निर्णय घेणाऱ्या उदिती सिंह, माही विज आणि यंग डीएसए यांच्यासमोर परिस्थिती नवी वळण घेऊ शकते. आता सलमानच्या ‘तथास्तु’ या संकेताचा नेमका अर्थ काय निघतो, हे आगामी भागात स्पष्ट होणार आहे.