ग्रामरोजगार सहाय्यकांनी वाजवले डफडे

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
बुलढाणा, 
buldana grs protestमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व आताची नविन विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियमित टक्केवारीनुसार मिळणारे मानधन मागील ६ ते ७ महिन्यांपासून थकीत आहे. सदरचे मानधन तात्काळ देण्यात यावी. ३ आटोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ८ हजार रुपये मासिक मानधन व २ हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात यावा. बुलढाणा जिल्हा ग्रामरोजगार साहेब संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीमंत देशमुख यांच्या नेतृत्वात जिजामाता पे-क्षागार पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य डफडे बजाव आंदोलन व सपत्नीक आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.
 
 
buldana
 
 
मानधन वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यात यावे. दोन वेळेची हजरी घेणे, ऑनलाइन कामे करणे सदरची कामे संपूर्ण दिवसभर करावी लागत असल्याने पुर्ण वेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा ऑनलाइनची कामे करण्यासाठी संगणक व मोबाईल डाटा उपलब्ध करून द्यावा सदर मागण्या मान्य करण्यासाठी यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनित्राताई पवार रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील शेकडो ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते.