पक्का रस्ता, आरोग्य सुविधा व सर्पदंशावरील लस उपलब्ध करण्याची मागणी

अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
बुलढाणा
hunger strike जळगाव जामोद तालुयातील भिंगारा येथून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम चाळीसटापरी आदिवासी पाड्यातील २२ वर्षीय गर्भवती महिला सादुरी राधेश्याम खरात हिचा सर्पदंशानंतर वेळेवर उपचार व लस न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप जयस नारीशक्तीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगिता व्ही. बारेला यांनी निवेदनातून केला आहे. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी जय आदिवासी युवा शक्तीच्या संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.
 
buldhana photo
निवेदनानुसार, २३ ऑगस्ट रोजी सादुरी खरात हिला साप चावला. चाळीसटापरीपर्यंत पक्का रस्ता नसल्याने तिला झोळीतून सुमारे तीन किलोमीटर पायी न्यावे लागले. वेळेवर सर्पदंशाची लस उपलब्ध न झाल्याने तिच्यासह पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.भिंगारा ते गोमालपर्यंत पक्का रस्ता तातडीने मंजूर करून पूर्ण करावा, भिंगारा उपकेंद्रात २४ तास डॉटर, नर्स, रुग्णवाहिका आणि सर्पदंशावरील अपींळ-डपरज्ञश तशपेा उपलब्ध ठेवावा, तसेच जळगाव जामोद येथील शासकीय रुग्णालयात सर्पदंश व रेबीजवरील लस २४ तास उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
सादुरी खरात यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित डॉटरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, मृत्यूची चौकशी करावी आणि पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात आहे. याशिवाय भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल येथील आदिवासी नागरिकांना वनपट्टे, वीज सुविधा, शाळा व अंगणवाडीच्या इमारती, तसेच आवश्यक रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.गोमाल येथे रस्त्याअभावी २०२४ मध्ये साथीच्या आजारामुळे तीन बालकांचा मृत्यू झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला असून, या घटनेचीही शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी आहे.