ज्ञानेश कुमार यांच्याशी निगडित प्रकरणाची चौकशी

केरळ सरकारचा निर्णय, २० वर्षे जुन्या घटनेचा तपास करणार

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
तिरुवनंतपूरम, 
kerala-pwd-probe-gyanesh-kumarकेरळ सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित एका गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे २००६ मध्ये या विभागाचे सचिव होते. २० वर्षानंतर या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचा निर्णय केरळच्या गृहविभागाने घेतला आहे. हे प्रकरण मलेशियातील इंजिनिअर ली सी बीन यांच्या मृत्यूशी संबंधित आहे.
 
 
kerla
 
बीन हे पाथी बेल या भारत-मलेशिया संयुक्त कंपनीचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक होते. राज्य परिवहन विभागाच्या प्रकल्पा अंतर्गत एमसी महामार्गाच्या विकासाचे काम या कंपनीकडे होते. २००६ मध्ये बीन यांनी क्वालालंपूरमध्ये आत्महत्या केली होती. प्रकल्पाचे रखडलेले बिल आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या अडचणींमुळे ते त्रस्त असल्याचे त्यावेळी समोर आले होते. कथित सुसाइड नोटमध्ये केरळमधील काही सरकारी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यात ज्ञानेश कुमार यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचे नंतर समोर आले. त्या पत्रामध्ये प्रकल्पातील कथित गैरव्यवहार, कामाच्या अडथळ्यांबाबत आणि अधिकाऱ्यांच्या दबावाचा उल्लेख होता. आता २० वर्षानंतर या प्रकरणात कुमार यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येणार आहे.
  
कागदपत्रे शोधूनही सापडली नव्हती
प्राथमिक चौकशीही सुरू झाल्यानंतर ती पुढे गेली नाही आणि हे प्रकरण रखडले होते. चौकशीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे शोधूनही सापडली नव्हती. पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील कागदपत्रांचा शोध घेतला होता, मात्र त्यातूनही ठोस कागदपत्रे मिळाली नसल्यानेजुन्या प्रकरणाच्या फाइल्स आता पुन्हा मागविण्याचा आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्याचा आदेश दिल्याचे केरळच्या गृह विभागाने निवेदनात म्हटले आहे.