वाढत्या चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी

पोलिस निरीक्षक नैना पोहेकर यांचे १० कलमी आवाहन

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
मानोरा,
pi naina pohekar शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांनी सजग राहून सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिस स्टेशन मानोरा, जि. वाशीम च्या वतीने पोलिस निरीक्षक नैना पोहेकर यांनी केले आहे.पोलिस प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नागरिकांसाठी १० महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस स्टेशन मानोराचे नागरिकांना आवाहन घरातील मौल्यवान दागिने बँकेत लॉकर मध्ये ठेवावे.
 

pi naina pohekar 
 
 
अनावश्यक पैसे घरात ठेवू नयेत, दैनंदिन खर्चाला लागेल एवढेच पैसे जवळ ठेवावे. घराचा बाहेर रात्री लाईट चालू ठेवावा. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा घराच्या बाहेर लावून घ्यावे. बाहेरगावी जातांना शेजारी सांगून जावे, तसेच मुक्कामी बाहेरगावी घरात पैसे व दागिने ठेवू नये. दिवसा गावात येणारे फेरीवाले यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे. सरपंच / ग्रामपंचायत सदस्य यांनी फेरीवाल्यांची विनारपूस करावी व मोबाईल मध्ये त्यांचा फोटो काढून ठेवावा. ग्राम सुरक्षा दलातील सदस्य यांनी रात्री आळीपाळीने गावात गस्त घालावी.pi naina pohekar गावात संशयीत इसम आढळल्यास त्यांना मारहाण न करता ताब्यात घेऊन पोलिसांना कळवावे. गावातील बंद पडलेले पथदिवे ग्रामपंचायत यांनी त्वरित चालू करून घ्यावे. आपल्याकडे असलेले शेती साहित्य, गाई, म्हशी दूर शेतात ठेवू नये. आपली सुरक्षा आपली जबाबदारी सतर्क रहा, सुरक्षित रहा असा संदेश देत पोलिस स्टेशन मानोरा यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.