अतुलनीय सहसाला कोटी कोटी प्रणाम...१८० जणांचे प्राण वाचवले,

पायलट स्मितला "मॅनकाइंड"कडून आयुष्यभर लक्षात राहणारं मोठं गिफ्ट

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
मुंबई
pilot-smit फ्लाय दुबई कंपनीच्या विमानाचे अपहरण करण्याचा सह वैमानिकाचा प्रयत्न मुंबईकर वैमानिक स्मित यांनी हाणून पाडला. त्यांच्यावर चाकूचे तीव्र घाव झालेले असतानाही संकट प्रसंगी त्यांनी दाखवलेले धैर्य, समयसूचकता याची दखल प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी 'मॅनकाइंड फार्मा'ने घेतली आहे. त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल त्यांचे कौतुक करणारे पत्र मॅनकाईंडने लिहिले आहे.
 

captain smit
सिद्ध औषध निर्माता कंपनी 'मॅनकाइंड फार्मा'ने स्मित यांना १ कोटी रूपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. कॅप्टन स्मित यांच्या शौर्याचा आणि नेतृत्वाचा गौरव करताना मॅनकाइंड फार्माने म्हटले आहे की, "काही माणसे त्यांच्या आयुष्यातल्या काही निर्णयांनी संपूर्ण देशावर कधीही न मिटणारी छाप सोडतात. तुम्ही अत्यंत कठीण प्रसंगात दाखवलेले असीम धैर्य, संयम आणि जबाबदारीची जाणीव याने भारत आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. एका भारतीयाने जगासमोर अशा प्रकारचे शौर्य आणि मानवता दाखवावी, ही आम्हा सर्व देशवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे."
 
परिस्थिती सर्वसामान्य असताना नाही, तर खरे नेतृत्व अत्यंत कठीण आणि संकटाच्या प्रसंगी सिद्ध होते. अशा कठीण क्षणी कॅप्टन स्मित यांनी स्वतःचा विचार न करता विमानातील क्रू मेंबर्स आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार केला आणि खऱ्या नेतृत्वाचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले, असे कंपनीने म्हटले.
'तुमच्याप्रति कृतज्ञता म्हणून छोटीसी भेट'
मॅनकाइंड फार्माचे व्हाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजीव जुनेजा यांनी कॅप्टन स्मित यांच्या नावे एक विशेष आभार पत्र जारी करून त्यांच्यासाठी खास बक्षीसाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मित यांना फोन करून त्यांचा विचारपूस केली. तुम्ही लोकांचे वाचवलेले प्राण आणि कोट्यवधी लोकांना दिलेली प्रेरणा या मूल्याची तुलना कोणत्याही पैशांशी होऊ शकत नाही. परंतु, केवळ शब्दांनी आभार न मानता कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅनकाइंड फर्माने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला १ कोटी रूपये देण्याचा नम्र निर्णय घेतला आहे. हा आमच्या आदराचा आणि कौतुकाचा एक छोटासा भाग आहे, असे कंपनीने पत्रात म्हटले आहे.