समाजाच्या विकासामध्ये राष्ट्राचेही हीत: अजय वडेरा

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
वाशीम,
ajay-vadera लोहाणा समाज हा विखुरला असून, संघटनात्मकदृष्ट्या समाजाची बांधणी अतीशय आवश्यक आहे. त्यासाठी लोहाणा कनेट अ‍ॅप निर्माण केल्या गेले आहे. समाज एकत्र आल्यास विकासाची वाटचाल सहज सोपी होऊ शकते. विकसीत समाजामुळे राष्ट्राच्या विकासालाही हातभार लागु शकतो. त्यामुळे समाज बांधांनी लोहाणा महापरिषदेशी सलग्न होऊन एकत्रीत यावे, असे आवाहन लोहाणा महापरिषदेचे विदर्भ प्रांध अध्यक्ष अजय वडेरा यांनी केले.
 
 
ajay-vadera
 
लोहाणा महापरिषदेची बैठक शनिवार, ३ ऑटोबर रोजी येथील हॉटेल मणिप्रभा प्रभा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रांत अध्यक्ष अजय वडेरा, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष चंद्रकांत पोपट व सचीव कमलेश वसाणी उपस्थित होते. यावेळी समाजाच्या उत्थानासाठी लोहाणा महापरिषद सक्रिय असून, समाजातील तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे कमलेश वसाणी म्हणाले. तर चंद्रकांत पोपट यांनी युवकांनी पुढाकार घेऊन आपले कौशल्य, अंगी असलेले कलागुण वेळोवेळी होणार्‍या कार्यक्रमाच्या मंचावर सादर करावे, असेही आवाहन केले. बैठकीस वशीम येथील हॉटेल मणिप्रभाचे चांलक हरिष औंधिया, दिलीप देवाणी, राजेश देवाणी, पंकज गढीय, पंकज नथवाणी, भिकुभाई वडेरा, भावेश वडेरा, नितीन भिमजीयाणी, रुपेश भिमजीयाणी, मनिष गढीया, मयुर सचदेव, रसिक गढीया, शिला नथवाणी, मोहिता देवाणी, प्रिया गढीया, आशिष औंधिया आदी उपस्थित होते.