जम्मू-काश्मीर
vande bharat crosses जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात वंदे भारत एक्स्प्रेसने जगातील सर्वाधिक उंचीच्या रेल्वे पुलावरून तसेच भारतातील पहिल्या केबल-स्टे रेल्वे पुलावरून ताशी १०० किलोमीटर वेगाने धावण्याचा टप्पा गाठला. चिनाब नदीवरील जगप्रसिद्ध चिनाब रेल्वे पूल आणि अंजी खड्ड रेल्वे पूल या दोन्ही महत्त्वाच्या पुलांवरून वंदे भारत एक्स्प्रेसने ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास केला. कटरा-बनिहाल या १११ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी हीच कमाल निर्धारित वेगमर्यादा आहे.
उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक उचित सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री माता वैष्णोदेवी कटरा-बनिहाल मार्गावरील कमाल वेगमर्यादा पूर्वी ताशी ७५ किलोमीटर होती. ती आता ताशी १०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने चिनाब रेल्वे पूल आणि भारतातील पहिला केबल-स्टे रेल्वे पूल असलेल्या अंजी पुलावरून ताशी १०० किलोमीटर वेगाने धाव घेतल्याने या मार्गाच्या क्षमतेत महत्त्वाची वाढ झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने या वेगवाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता केल्यानंतर यंदाच्या ऑगस्टमध्ये रेल्वे मंत्रालयाने ताशी १०० किलोमीटर कमाल वेगमर्यादेला मंजुरी दिली होती. त्यानंतर गुरुवारी कटरा-बनिहाल विभागात वाढीव वेगाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या बदलामुळे रेल्वेसेवेचे संचालन अधिक कार्यक्षम होण्याबरोबरच प्रवासाचा कालावधी कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा परिचालनात्मक टप्पा मानला जात आहे.
यापूर्वी श्री माता वैष्णोदेवी कटरा-संगलदान विभागात रेल्वेगाड्यांना ताशी ८५ किलोमीटर, तर संगलदान-बनिहाल विभागात ताशी ७५ किलोमीटर वेगाने धावण्याची परवानगी होती. आता कटरा-बनिहालच्या संपूर्ण १११ किलोमीटर मार्गासाठी कमाल वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर करण्यात आली आहे.
USBRL प्रकल्पातील vande bharat crosses कटरा-बनिहाल हा अत्यंत आव्हानात्मक आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा भाग आहे. जम्मू-काश्मीर खोरे देशाच्या इतर भागांशी अखंड रेल्वे संपर्काने जोडणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. हा रेल्वेमार्ग पीर पंजाल आणि हिमालयाच्या खालच्या पर्वतरांगांमधील दुर्गम आणि आव्हानात्मक भौगोलिक प्रदेशातून जातो. मार्गात खोल दऱ्या, तीव्र उतार, मोठ्या नद्या आणि गुंतागुंतीच्या भू-रचना असल्याने रेल्वे मार्ग उभारण्यासाठी अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.या १११ किलोमीटरच्या मार्गावर ३३ बोगदे आहेत. त्याचबरोबर रियासीजवळ चिनाब नदीवर उभारलेला जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वे पूल आणि अंजी खड्डवरील भारतातील पहिला केबल-स्टे रेल्वे पूल या मार्गाची वैशिष्ट्ये आहेत. या कठीण भौगोलिक परिस्थितीत उभारण्यात आलेल्या बोगद्यांसह उंच पूल आणि आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांमुळे कटरा-बनिहाल मा