मुंबई,
vastu tipsहिंदू धर्मानुसार, तुळशीच्या रोपाला फार पवित्र मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानण्यात आलं आहे. याच कारणामुळे अनेक घरात तुळशीची पूजा केली जाते. तसेच, संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो.
वास्तूशास्त्रानुसार सुद्धा तुळशीचं रोप घरी ठेवण्यासाठी काही दिशा आणि स्थान शुभ मानलं जातं. तर, काही ठिकाणी तुळशीचं रोप लावल्यापासून सावध राहिलं पाहिजे असा इशाराही देण्यात आला आहे. मान्यतेनुसार, जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी तुळशीचं रोप लावलं तर त्यापासून मिळणारे शुभ परिणाम कमी होऊ शकतात. त्यामुळे घरात कोणती अशी 7 ठिकाणं आहेत जिथे तुळशीचं रोप लावू नये हे आपण जाणून घेऊयात.
वास्तूशास्त्रानुसार, तुळशीचं रोप दक्षिण दिशेला लावू नये. धार्मिक मान्यतेनुसार, दक्षिण दिशेचा संबंध यमदेवाशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे तुळशीचं रोप लावण्यासाठी ही दिशा योग्य नाही. या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला रोप लावू शकता.
बेडरुममध्ये तुळशीचं रोप ठेवू नये
तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानण्यात आलं आहे. त्यामुळे ते बेडरुममध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या स्वच्छ ठिकाणी तसेच, शांततेच्या ठिकाणी रोप ठेवू शकता.
बाथरुम किंवा शौचालयाच्या ठिकाणी रोप ठेवू नये
तुळशीचं रोप बाथरुम किंवा शौचालयाच्या ठिकाणी लावू नये. धार्मिक मान्यतेनुसार, या जागा तुळशीच्या रोपासाठी पवित्र मानल्या जात नाहीत. तुळशीला नेहमीच स्वच्छतेच्या ठिकाणी ठेवावं.
अंधाराच्या ठिकाणी तुळस ठेवू नये
तुळशीच्या रोपाला जिथे हवा आणि उजेड पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ठेवू नये. बंद खोलीत किंवा अंधाराच्या ठिकाणी तुळशीचं रोप लावल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
गॅसजवळ रोप ठेवू नये
वास्तूशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाला कधीच स्वयंपाकघरात ठेवू नये. जास्त गरमी आणि धुरामुळे रोपाचं नुकसान होऊ शकतं.
कचऱ्याच्या पेटीजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी रोप ठेवू नये
तुळशीला आपण पवित्र मानतो. त्यामुळे त्या रोपाला कचऱ्याच्या डब्ब्याजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. तुळशीच्या रोपाची नियमित काळजी घ्यावी.
जिन्याखाली ठेवू नका
घरात जिन्याखाली तुळशीचं रोप लावू नये. अशा ठिकाणी आवश्यक असा उजेड तसेच हवा नाही मिळत.
वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य...
वास्तू शास्त्रानुसार, तुळशीचं रोप उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं. अनेक घरांत याच दिशेला तुळशीचं रोप लावलेलं पाहायला मिळतं.