गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्याअभावी आरोपी निर्दोष

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
prove the crime रामटेक येथील एका बहूचर्चित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या रॅकेट प्रकरणी आणि मानवी तस्करीच्या आरोपांमध्ये गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाही. त्याचा लाभ आरोपींना देण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवून जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना निर्दोष मुक्त केले. हा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. जे. मोडक यांनी दिला. गेल्या दहा वर्षांपूर्वी (१८ सप्टेंबर २०१६) रोजी रामटेकचे तत्कालीन उपअधीक्षक विक्रम कदम यांना रामटेक परिसरातील हॉटेलचा मालक राजेश शाहू हा बाहेरून पैशांच्या मोबदल्यात देहव्यवसायास करीत असल्याची माहिती मिळाली होती.
 

prove the crime 
 
 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक (पंटर) व पंचांच्या सहाय्याने या हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली होती. या प्रकरणी हॉटेल मालक राजेश रामकुमार शाहू , राधारामन ऋषिकेश तिवारी, मोरेश्वर श्यामराव हजारे आणि सुनील किसन देवगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींतर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल अंबादे यांनी बाजू मांडली.
युवतींना हजर केले नाही
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तपासलेले पंच साक्षीदार तसेच हॉटेलमधील वेटर आणि व्यवस्थापक यांनी कोर्टात सरकार पक्षाच्या बाजूने साक्ष देण्यास नकार दिला. या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या युवतींना कोर्टात हजर करण्यात आले नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावा मिळू शकला नाही. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार छापा आणि तपास करण्यासाठी विशेष पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक असते. परंतु या प्रकरणात तशी कोणतीही अधिकृत नोंद समोर आली नाही.prove the crime त्यामुळे पोलिसांच्या संपूर्ण तपासावर संशय निर्माण झाला आहे, असे बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल अंबादे यांनी कोर्टाला सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून कोर्टाने सरकारी पक्ष आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट करत सर्व आरोपींना दोषमुक्त केले.