भारत-न्यूझीलंड सामना मोफत पाहण्याची संधी

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
india-new-zealand-match-for-free भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना आज ऑकलंड येथे खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचे लक्ष्य टीम इंडियासमोर असणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. मात्र, टीव्हीवर सामना पाहण्यासाठी सोनी स्पोर्ट्स चॅनलचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर सामना पाहण्यासाठी SonyLIV ॲपचा वापर करता येईल.

india vs new zealand
त्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, क्रिकेट चाहत्यांना हा सामना विनामूल्य पाहण्याची संधीही उपलब्ध आहे. त्यासाठी घरात डीडी फ्री डिश कनेक्शन असणे आवश्यक आहे. भारत-न्यूझीलंड मालिकेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स चॅनलवर मोफत केले जात आहे. त्यामुळे चाहत्यांना कोणतेही शुल्क न भरता घरबसल्या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान, आजचा चौथा टी-२० सामना दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी दुपारी १२ वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. आता या सामन्यात भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.