जनगणनेच्या तारखा जाहीर

२५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणार घरोघरी सर्व्हे\

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
census केंद्र सरकारने देशात जनगणनेसाठीच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या. ही जनगणना २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत देशभरात घेतली जाईल, मात्र निवडणूक असलेली आणि बर्फाच्छादित राज्यांना यातून वगळण्यात आले आहे.

census
२५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत देशभरात घरोघरी भेट देऊन कर्मचारी सर्व्हे करणार असून, यातून नागरिकांच्या आकडेवारीसह इतर माहिती गोळा करणार आहे. देशात शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. त्यानंतर कोरोना महामारीमुळे २०२१ मध्ये प्रस्तावित असलेली जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. जनगणनेसाठी निश्चित केलेल्या कालावधीत देशाच्या विविध भागांतील लोकसंख्येची गणना केली जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
 
बर्फवृष्टीग्रस्त राज्ये आणि निवडणुका असलेली राज्ये या प्रक्रियेत समाविष्ट केली जाणार नाहीत. अशा राज्यांना नियोजित जनगणनेच्या कालावधीतून सूट देण्यात आली आहे. या राज्यांसाठी स्वतंत्र तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांच्या निगराणीत देशभरात जनगणनेची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती सरकारला देशातील लोकसंख्येची परिस्थिती समजून घेण्यास आणि भविष्यातील नियोजनाचा पाया तयार करण्यास मदत करेल.